Saturday, December 21, 2024
Homeराज्यमोठी खुशखबर ! महाराष्ट्र 1 एप्रिलपासून CNG स्वस्त

मोठी खुशखबर ! महाराष्ट्र 1 एप्रिलपासून CNG स्वस्त

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी (CNG) इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली.

वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. 

प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

महागाईचा भडका, पेट्रोल डिझेल दरात आठवड्यात चौथ्यांदा वाढ

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

सुधीर बेडेकर : डाव्या पुरोगामी चळवळीतील एक सर्जनशील विचारवंत


संबंधित लेख

लोकप्रिय