Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC: मंद तारकांनी मैत्री कट्ट्याचे तारांगण फुलवले

PCMC: मंद तारकांनी मैत्री कट्ट्याचे तारांगण फुलवले

सँडविच मैत्री कट्ट्याचा सहावा वर्धापन दिन साजरा (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : हयात भर आपल्या कर्तुत्वाने विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत चमचमणारे तारे वयाच्या साठी नंतर मंद होऊ लागतात. मात्र वृद्धापकाळातही त्याच उमेदीने त्याच मनोबलाने हे मंद तारे सुद्धा आजही तारांगण फुलवू शकतात हे आज दिसून आले.

निमित्त होते सँडविच कंपनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या मैत्री कट्ट्याच्या सहाव्या वर्धापन दिनाचे.

सँडविक मैत्री कट्ट्याचा सहावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडच्या सहकार क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या स्थापनेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व व शहरात अनेक पतसंस्थांचे स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नाना भुजबळ, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या स्थापनेतील आणखी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व व उद्योजक रंगनाथ यलमार, पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व पुणे शहर भाजपाचे विद्यमान उपाध्यक्ष श्याम सातपुते यांच्यासह मच्छिंद्र राजे, शांताराम जावळकर, रमेश उंदरे, प्रकाश बारसे, प्रसाद भुरेवार, हिरामण बांदल, वसंत सुतार आदी प्रमुख निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. (PCMC)

यावेळी अनेक कार्यक्रम निवृत्त कर्मचाऱ्यांनी सादर केले या कार्यक्रमास सांडवेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्यांच्या सौभाग्यवती देखील उपस्थित होत्या या जमलेल्या मैफलित राम गवारे या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का या भावगीताने मैत्री कट्ट्याचे तारांगण फुलवले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा भालेराव यांनी केले.

****

***


संबंधित लेख

लोकप्रिय