Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयमहागाईचा भडका ! पेट्रोल-डिझेलनंतर आता 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार !

महागाईचा भडका ! पेट्रोल-डिझेलनंतर आता 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार !

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेड्यूल औषधांच्या किंमती वाढवण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे एप्रिलपासून 800 हून अधिक अत्यावश्यक औषधे 10 टक्क्यांहून अधिक महाग होतील. औषधांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

1 एप्रिलपासून सर्वात सामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या यादीतील जवळपास 800 औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढू शकतात. एप्रिलपासून ताप, संसर्ग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचाविकार, अशक्तपणा यावर उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत.

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ

शेड्यूल ड्रग्स म्हणजे ही अशी औषधे आहेत जी अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत येतात आणि अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीमुळे सरकार त्यांच्या किमती नियंत्रित करते. आणि ती औषधे सर्वसामान्य लोकांना परवडणारी असावीत, परवानगीशिवाय त्यांच्या किमती वाढवता येत नाहीत, असा नियम आहे. सरकारने त्यांच्या किमती वाढवण्यास परवानगी दिली आहे. आता या अत्यावश्यक औषधांसाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. पुढील महिन्यापासून पेनकिलर आणि पॅरासिटामॉल, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक औषधे महाग होणार आहेत.

इंधन दरवाढीमूळे सरकार विरोधात महिला नेत्या आणि गृहिणी तीव्र संतापल्या

फार्मा उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन वर्षांत काही प्रमुख API च्या किमती 15 ते 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, सिरप आणि तोंडावाटे दिली जाणारी अनेक औषधे आणि वैद्यकीय प्रयोगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्लिसरीनच्या किंमती 263 टक्के आणि पॉपीलीन ग्लायकोल 83 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. 

मध्यंतरीच्या किमती 11 टक्क्यांवरून 175 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. वाढत्या किमती पाहता, गेल्या वर्षी 2021 च्या अखेरीस औषध उद्योगाने केंद्र सरकारला औषधांच्या किमती वाढवण्याची विनंती केली होती.

माधुरी कोरडे यांची जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सदस्यपदी निवड !

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय