Sunday, December 22, 2024
Homeजिल्हा२ दिवस संपूर्ण अंगणवाड्या बंद ठेऊन संप यशस्वी !

२ दिवस संपूर्ण अंगणवाड्या बंद ठेऊन संप यशस्वी !

सातारा : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) सह ११ केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने ४ कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा, महागाई कमी करा या मागण्यासाठी २८ व २९ मार्च २०२२ रोजी देशव्यापी कामगारांचा संप जाहीर झाला होता. त्याप्रमाणे आज २८ मार्च २०२२ रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू) च्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यासाठी सातारा जिल्हा परिषद, सातारा येथे दुपारी १ वाजता निदर्शने करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

यावेळी केलेल्या भाषणात केंद्र सरकारचे कामगारविरोधी धोरणाचा निषेध आनंदी अवघडे यांनी केला. २ दिवस काम बंद ठेवून या निदर्शनात अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

देशव्यापी संपानिमित्त पुण्यात कामगारांचे जोरदार आंदोलन, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग !

यावेळी ४ कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे धोरणे रद्द करा, महागाई कमी करा, सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरित भरा, सुपरवायझरच्या जागांची भरती त्वरित काढा, आधुनिक मराठी ॲप असलेले अँड्रॉइड फोन त्वरित द्या, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय सेवेत समाविष्ट करा आदी मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात आनंदी अवघडे, माणिक अवघडे, मालन गुरव, प्रतिभा भोसले, मनीषा काटकर, भारती चव्हाण, चंद्रकला शिंदे, अर्चना सावंत, अर्चना साळुंखे, भारती आहिरेकर, प्रतिभा भोसले, छाया पंडित, सीमा जाधव, उषा पवार, शोभा शिवदे, बेबी मोहिते, निलोफर मुल्ला, सुनंदा वसव आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ

महागाईचा भडका ! पेट्रोल-डिझेलनंतर आता 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार !

संबंधित लेख

लोकप्रिय