जुन्नर : माधुरी सतिश कोरडे यांची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. जनवादी महिला संघटनेचे जिल्हा अधिवेशन नुकतेच पुणे येथे संपन्न झाले, यावेळी माधुरी कोरडे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीबद्दल बोलताना माधुरी कोरडे म्हणाल्या, “जुन्नर तालुक्यातील स्त्रियांना सक्षम करण्यासाठी काम करायचे आहे. तसेच स्त्रियांचे सामाजिक, कौटुंबिक प्रश्न सोडविण्याचे काम जनवादी महिला संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या निवडीबद्दल त्यांचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
जुन्नर : ग्रामपंचायत जळवंडी अंतर्गत खडकुंबे येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात
जुन्नर : आदिवासी भागातील महिलांना उद्योजकता प्रशिक्षण, तर 12 हजार रूपयांचे अर्थसाहाय्य
जुन्नर : माजी आमदारांच्या दूरदृष्टीमुळेच प्रकल्प तालुक्यात आला – रवींद्र मिर्लेकर