पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : “आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की, आम्ही जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करू,आम्ही आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवू.” अशी शपथ आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या उपस्थितीत घेतली. (PCMC)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांची जयंती अहिंसा आणि सद्भावनेची सामुहिक शपथ घेऊन उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण त्यांना अभिवादन करण्यात आले. (PCMC)
या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी अनिल पासलकर, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे,सनी कदम, नितीन समगीर, बालाजी अय्यंगार, कनिष्ठ अभियंता वृषाली पाटील, सर्व्हेअर हनुमंत टिळेकर, उपलेखापाल अनिल कु-हाडे, राजेश सोळंकी, सागर देवकुळे, समीर ठाकर,मुख्य लिपिक स्वप्निल भालेराव, माया वाकडे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवसाची शपथ घेऊन सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.