Monday, December 23, 2024
Homeराज्यBadlapur : चिमुरडी अत्याचार, संतप्त नागरिकांचा उद्रेक पोलिसांचा लाठीचार्ज

Badlapur : चिमुरडी अत्याचार, संतप्त नागरिकांचा उद्रेक पोलिसांचा लाठीचार्ज

बदलापूर : बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हजारो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानाकात रेल्वे रुळांवर उतरून रेल्वेमार्ग रोखून धरला . गेल्या काही तासांपासून रेल्वे रोखल्यानं सीएसएमटी आणि कर्जत अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या रेल्वे ठप्प झाल्या आहेत. (Badlapur)

पश्चिम बंगालमधील कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानं देशभरात संतापाची लाट असतानाच, महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेनं त्यात भर घातलीय. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. (Badlapur)

रस्त्यावर उतरलेल्या लोकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, लोकांमधील संताप पाहता, पोलीसही हतबल अवस्थेत दिसून येत होती.

अखेरीस संध्याकालच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार करत, आंदोलकांना रेल्वे रुळांवरून हटवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. (Badlapur)

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. यावेळी आंदोलकांनी पोलिसांची गाडी उलटली. पोलिसांच्या वाहनाचे नुकसान केले.
संपूर्ण बदलापूर स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. रस्त्यावरचा जमाव माघार घेत नसल्यामुळे पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामुळे आंदोलकांची पांगापांग झाली. बदलापूरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर लक्ष ठेवून आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय