Wayanad : केरळमधील वायनाड (Wayanad) जिल्ह्यातील मेप्पाडी या डोंगराळ भागात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या भूस्खलनामुळे शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू केले आहे.
अती मुसळधार पाऊस सुरू असतानाच मंगळवारी पहाटे वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन काही गावे ढिगाऱ्यात दबली गेली आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार एकूण ४५ मृत झाल्याची खबर हाती आली आहे.
केंद्र सरकारने केरळ सरकारच्या मदतीसाठी सैन्य दलास पाचारण केले आहे. ऑल इंडिया रेडिओ त्रिवेंद्रमने सदर दुर्घटनेचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. वायनाड (Wayanad)
जिल्हा प्रशासनाने या दुर्घटनेची व्याप्ती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्यमंत्री बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी वायनाड जिल्ह्यात पोहचणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या ढिगाऱ्यात शेकडो नागरिक दबल्याचे सांगितले जात आहे.
Wayanad
घटनेची माहिती मिळताच सरकारी बचाव यंत्रणा कामाला लागल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही बचावकार्यात भाग घेतली असून हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत आणि एका कंट्रोल रुमची स्थापना केली आहे. बचावकार्यासाठी हवाईदलाचे Mi-17 आणि ALH हे दोन हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांक 8086010833 आणि 9656938689 वर कोणत्याही प्रकारची उपचारासंबंधी मदत मिळवता येईल. तसेच वैथिरी, कालपट्टा, मेप्पाडी, आणि मनंथावडी या भागातील रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहेत. (Breaking)
आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, भूस्खलनाची घटना घडताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आहे. लवकरच आणखी आरोग्य कर्मचारी घटनास्थळी तैनात केले जाणार आहेत.
हेही वाचा :
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’