Monday, December 23, 2024
Homeजिल्हापुण्यातील पाणी प्रश्न पेटला, गिरीश बापट यांच्या घरासमोर राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन

पुण्यातील पाणी प्रश्न पेटला, गिरीश बापट यांच्या घरासमोर राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन

पुणे : पुणे शहरातील पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे, एकीकडे भाजपकडून खासदार गिरीश बापट हे आयुक्तांच्या घरी पाण्यात प्रेशर चेक करताना दिसतात तर दुसरीकडे खासदार गिरीश बापट अन्य ठिकाणी जाऊन पाण्याच्या प्रश्नाबाबत बैठकीतून निघून जाताना दिसतात. त्यामुळे आता पाण्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

सर्वात मोठी बातमी : महाराष्ट्र निर्बंधमुक्त

नागरिकांना पाणी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगरपालिकेत सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षात शहरात समान पाणी वाटपाचे नियोजन केले नाही, असा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘अहो बापट करू नाटक’, ‘पुणेकर नागरिकांची फसवणूक करणा-या गिरीश बापट राजीनामा द्या’, अशा घोषणा देण्यात आल्या.

व्हिडिओ : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पथारी हातगाडी सर्वसामान्यांची लूट थांबवा – बाबा कांबळे

दरम्यान, पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्तांच्या घरी का भेट दिली, असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय