Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : प्रधानमंत्री आवास योजना बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली येथे नागरी समस्या, पालिका सुस्त,...

PCMC : प्रधानमंत्री आवास योजना बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली येथे नागरी समस्या, पालिका सुस्त, लाभार्थी त्रस्त

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पंतप्रधान आवास योजना बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर साकरण्यात आलेला 1288 व 1,442 घरांचा गृहप्रकल्प आहे. (pcmc)

या घरांचा ताबा मिळण्या अगोदरच तेथील लाभार्थी नागरिकांकडून सदनिकेच्या किमती गेल्या 2 वर्षापासून व्याजासह वसूल करण्यात आल्या. तरीदेखील तब्बल 2 वर्षाच्या काळानंतर ताबा मिळूनही अद्याप तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. (pcmc)

दिनांक 09 जुलै रोजी चऱ्होली येथील 03 नंबर बिल्डिंग मधील अंगत शिवणे या सदनिका धारकांच्या राहत्या घरात एका सदनिकेत छताला टांगलेला चालू फॅन कोसळून शिवणे यांच्या मुलाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. असे प्रकार घडत आल्यास नागरिकांमध्ये सध्या संतापेची लाट उसळून आलेली आहे. (pcmc)

ठिकठिकाणी तुंबलेली गटारे, अपुरा पाणी पुरवठा, सदनिकेत छतातून टपकणारे पाणी, सांडपाणी / मैला शुद्धीकरण याची दुर्गंधी, वीज गेल्यास पर्यायी सुविधा उपलब्ध नाही, पार्किंग सुविधा नाही, चेंबरचे पाणी जायला पाईपलाईन नाही, सार्वजनिक उत्सव समारंभ व उद्यान याचे काम अजून अद्याप झालेले नाही, इत्यादी अनेक सुविधा बाबत येथील लाभार्थी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करून त्रस्त झाले आहेत.

पाण्याच्या टाकीची ऊंची जमिनीलगत असल्याने पावसाचे पाणी पिण्याच्या टाकीत जाण्याची शक्यता. STP मधून प्रक्रिया करून आलेले सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकाच ठिकाणी एकलगट असलेला साठा. गती रोधक नसल्याने भरधाव येणारी वाहने वेग नियंत्रित होत नाहीत. (pcmc)

अशा अनेक विळख्यांनी वेढलेल्या नागरिकांची ही वसाहत आजच्या काळात वावरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना बाबत येथील गरीब नागरिकांच्या विविध समस्या निवारण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने मूलभूत समस्या निवारण करण्यासाठी अग्रक्रम द्यावा, असे केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. मनपा मध्ये प्रशासकीय राजवट आल्यापासून पालिका प्रशासन सुस्त झालेली आहे.

बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल धारकांच्या प्रश्नाकडे
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन लक्ष देणार आहे का ? असा सवाल येथील रहिवाशी विचारत आहेत. अशा खूप समस्या आज लाभार्थ्यांना आहेत.यावर लवकर जर तोडगा नाही निघाला तर लवकरच याचा भडका होऊन, एक मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहू शकते.

अशा प्रकारे छत गळणे,भिंतीतून पाणी पाझरणे तसेच कॉमन समस्या विषयी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील त्रस्त लाभार्थीचे म्हणणे आहे की, पालिका प्रशासनिक अधिकारी फक्त आम्ही करून देतो, अशी आश्वासने देतात, पण आता पर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाहीत.

तरी या वर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन सर्व पेंडिंग कामे पूर्ण करून द्यावीत, अन्यथा चऱ्होली / बोऱ्हाडेवाडी येथील लाभार्थी महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे. असे अनेक त्रस्त लाभार्थीनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय