ऊसतोड कामगार मंडळाच्या स्थापनेबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे अभिनंदन
पिंपरी : महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहूप्रतीक्षित कष्टकरी उसतोड कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे उद्घाटन पुणे येथे करण्यात आले.
अत्यंत महत्वाचे मंडळ अस्तित्वात आणल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते, राजेश माने, राजु बिराजदार, सालिम डांगे, चंद्रकांत कुंभार यानींं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व ज्यांनी या महामंडळासाठी पाठपुरावा केला असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे कामगारांच्या वतीने पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.
पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच, महागाई सुध्दा प्रचंड वाढण्याची शक्यता
गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असे मंडळ व्हावे यावर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या मात्र प्रत्यक्षात हे मंडळ येत नव्हते. याला मूर्त स्वरूप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. आता जास्तीत जास्त नोंदणी करुन अधिक कामगारांना लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री पवार यानी ऊसतोडणी करताना या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील १३ जिल्ह्यातून येणाऱ्या ९ ते १० लाख ऊसतोड कामगारांना आरोग्य, शिक्षण आदी सुविधा देताना त्याला ओळख मिळणे गरजेचे आहे. त्यांची पेन्शन, तात्पुरती घरे, विमा सुविधा देण्याबाबतही विचार करावा लागेल. उसतोडणीसाठी आधुनिक साधनांच्या निर्मिती बाबतही विचार करावा. त्याचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांच्या मुलांना प्रगतीची संधी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे नमुद केले. धनंजय मुंडे यानीं कामगारांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी सरकार काटीबद्ध राहील असे अश्वासन दिले.
अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर ‘विचारमंथन शिबीर’
रा़ज्यात बरसणार पाऊस, ‘या” जिल्ह्यांना अलर्ट जारी