Vadgaon Maval : मोजे सुदवडी आणी जांबवडे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कामगार वस्त्या निर्माण झाल्या असून, हा सर्व कामगार असंघटीत क्षेत्रातील असून त्यांनी आपल्या मुला बाळाच्या पोटाला चिमटा देऊन गुंटा/अर्धा गुंटा जागा घेऊन, स्वतःच्या हक्काचा निवारा केला मात्र या परिसरात चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. (Vadgaon Maval)
त्याच बरोबर त्याच्या राहत्या जागेच्या 7/12(सातबारा) चा प्रश्न मागील 8 ते 10 वर्षा पासून प्रलंबित असून ते सातबारा त्यांच्या नावे नोंदणी करावी यासाठी प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हे 15 हजार पासून 60 हजार पर्यंत मागणी करीत असल्याने या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड गणेश दराडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार मांडवे यांनी निवेदन स्वीकारत पुढील पंधरा दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी गणेश दराडे यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. त्याच बरोबर विनोद गायकवाड, सचिन देसाई, अँड अमीन शेख, दीपक राजगुरू, अपर्णा दराडे, बाळासाहेब शिंदे. यांनीही भाषणे केली. तसेच नामदेव सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, विठ्ठल कदम, जितेंद्र गायकवाड, सुभाष पतंगे, दवलत शिंगटे, पावसू करे, शीतल जाधव, मनीषा जाधव, दवलत माने, पार्वती सुरवसे, ज्ञानेश्वर घोगरे यांनी मोर्चाची जोरदार तयारी केली. व आभार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी मानले.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण
अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश