नारायणगाव : नारायणगाव येथील महावितरणच्या दोन शाखा अभियंत्यांसमोर वीज वितरण कंपनीचा स्थानिक वायरमन व कंत्राटी कामगार या दोघात नारायणगाव टोमॅटो उपबजारात फ्री स्टाईल हाणामारी झाली.
कंत्राटी कामगार सुनील जाधव व वायरमन रामदास बांबळे यांच्यात ९ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता ही मारामारी झाली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी परस्पर विरोधी तक्रारी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिल्याचे सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.
माणिकडोह धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक, कमी पाणीसाठा …
कंत्राटी कामगार हा स्वतः च्या घरातील वीज मीटरमधून चोरी करत असून वीज ग्राहकांना सुध्दा वीज चोरीसाठी मदत करत असल्याची तक्रार वायरमनने महावितरणचे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याने ही हाणामारी झाली.
वायरमन बांबळे हे ग्राहकांची फसवणूक करतात, निवासस्थानी रहात नाहीत, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नाहीत, सायंकाळी फोन बंद करून गावी निघून जातात, असा तक्रार अर्ज सुमारे शंभर ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे पंधरा दिवसांपूर्वी केला होता. हा तक्रार अर्ज जाधव यांनी पुढाकार घेऊन केला असल्याचा संशय बांबळे यांना होता. यावरून ही हाणामारी झाली.
जुन्नर : घाटघर येथे रात्री भरला रोजगार मेळावा, आणि पहा काय झाले…
जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे तालुका अधिवेशन संपन्न, शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी…