Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाभाजपाच्या प्रवक्त्यांच्या बेताल वक्तव्यावर माकपाचे तीव्र निदर्शने!

भाजपाच्या प्रवक्त्यांच्या बेताल वक्तव्यावर माकपाचे तीव्र निदर्शने!

नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरा – कॉ. नरसय्या आडम मास्तर

सोलापूर : एका धर्माच्या भावनांना आघात पोहचेल असे वक्तव्य केंद्रातील सत्ताधारी असणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे केले आहे. त्याचे गंभीर पडसाद देशात व जगात उमटलेले दिसून येत आहेत. भारतीय संस्कृती आणि संविधानानुसार कुठल्याही धर्म विशेष अथवा राजकीय पक्षाच्या व्यक्तींना दुसऱ्या धर्माच्या भावना व श्रद्धांवर आघात करण्याचा अधिकार नसून सर्वाना आपापल्या धर्मानुसार राहण्याचा, वागण्याचा व त्याचे अनुसरण करण्याचा अधिकार आहे. 

याचे परिणाम जगातील कित्येक देशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधावर होत असून या गोष्टी देशाच्या हिताच्या दृष्टीने अयोग्य आहे. म्हणून केंद्रातील सत्ताधारी भाजपाचे प्रतोद असणाऱ्या नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित महमद पैगंबर यांच्याबद्दल अनुउद्गार काढून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावल्याबद्दल कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांना तातडीने अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. या व अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व बे-लगाम वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यांच्यावर यु.ए.पी.ए.कायद्याअंतर्गत राष्ट्रद्रोहाचा खटला भरा अशी मागणी सकाळी १०.४४ वाजता महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे केल्याची माहिती निदर्शने करताना दिली. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शुक्रवार दि. १० जून २०२२ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांनी प्रेषित महमद पैगंबर यांच्याबद्दल अनुउद्गार काढून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावल्याबद्दल संविधानानुसार कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हि प्रमुख मागणी घेऊन माकपाचे जिल्हा सचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व नेते व कार्यकर्ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून काळ्या रंगाच्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून केंद्र सरकार आणि भाजपाचा जोरदार घोषणा देऊन निषेध करण्यात आला. सदर आंदोलनात पोलिसांनी ध्वनीक्षेपक लावण्यास मज्जाव केला. 

यावेळी मुस्लीम धर्मगुरु शहर काझी अमजदअली यांनी निदर्शनाला पाठींबा देताना म्हणाले कि, आज केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार आणि त्यांचे प्रवक्ते देशामध्ये अराजकता, अशांतता, धार्मिक ध्रुवीकरण करून दंगली घडविण्याचा डाव रचलेला आहे. वास्तविक या देशामध्ये भारतीय संविधानानुसार लोकशाही मार्गाने सर्व जाती जमाती व धर्माचे लोक सलोख्याने राहत आहेत. परंतु हि एकात्मता तोडून लोकांची माथी भडकावून सत्तेच्या लालसेपोटी अशा प्रकारची कृत्ये हेतुपुरस्सर घडवून आणण्याचा प्रयत्न चालू आहे. देशाची धर्मनिरपेक्षता, अखंडता, आणि शांतता अबाधित राखण्यासाठी अशा प्रवृत्तींना आळा घालावे असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले कि, संघी आणि मनुवादी लोक या देशाला कधीच तोडू शकणार नाही. कारण या देशात मानवतेचे व शांततेचे पाईक आहेत.  

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

तद्पुर्वी प्रास्ताविक करताना जिल्हा सचिव एम.एच.शेख म्हणाले कि, कित्येकांच्या कत्तली करणारा मास्टर माइंड अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना आता आपण सत्तेतून बाहेर पडणार याची जाणीव होत आहे. म्हणूनच त्यांची काश्मीर ३७० कलम, CAA, NRC, समान नागरी कायदा, राम मंदिर अशा वादातीत मुद्द्यांवर दडपशाही करून निर्णय देशावर लादले. ख्रिश्चन, अल्पसंख्यांक आणि दलित यांना लक्ष्य केले. २५० पेक्षा अधिक खर्च जमीनदोस्त केले. हे कशाचे द्योतक आहे असा खडा सवाल या प्रसंगी केले. 

यावेळी व्यासपीठावर सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख (मेजर), व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, म.हनीफ सातखेड, शंकर म्हेत्रे, अनिल वासम आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.

यावेळी सुनंदाताई बल्ला, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, लिंगव्वा सोलापुरे, हसन शेख, विल्यम ससाणे, बापू साबळे, दाऊद शेख, नरेश दुगाने, दीपक निकंबे, मुन्ना कलबुर्गे, सनी शेट्टी, अकिल शेख, सलीम मुल्ला, अशोक बल्ला, कादर शेख, अप्पाशा चांगले, दत्ता चव्हाण, मल्लेशम कारमपुरी, अफसाना बेग, शामसुंदर आडम आदींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय