बार्शी : पुरोगामी विचार मंचच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आयटक कामगार केंद्र येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व्याख्यान घेण्यात आले.
यावेळी प्रा.शंकर अंकुश म्हणाले “मेकॉलेचा झिरपणारा शिक्षण सिद्धांत नाकारून महात्मा फुले यांनी खालील वर्गाला शिक्षण देण्याची मागणी केली, उच्चशिक्षित शिक्षक हे प्राथमिक शिक्षणासाठी नेमल्यास पुढील पिढी उच्चशिक्षित बनवू शकेल, स्त्री शुद्र अतिशुद्र यांना शिक्षण देणे, जातीअंत करणे, ब्राह्मणांवर टीका करण्याऐवजी ब्राह्मणवादावर टीका करणे हा फुलेवादाचा विचार आहे.”
समाजव्यवस्थेला न घाबरता आजच्या साहित्यिकांनी खरे लिहिले पाहिजे – डॉ. विश्वास मेहेंदळे
यावेळी कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद म्हणाले “महात्मा फुले यांनी मुठा नदीवर धरण बांधले, त्यातले पाणी शेतकऱ्यांना दिले, दोनशे एकर बागायत शेती केली, तीन हजार कामगारांना काम दिली, खोती परंपरेला विरोध केला, जुन्नर येथील पाच हजार शेतकऱ्यांचा दोन वर्ष संप घडवून आणला व व्याजदर कमी केला, चौथे शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी टिळक आगरकरांना कोर्ट कामात आर्थिक मदत केली, कामगार शेतकरी यांचे भव्य प्रतीक बळीराजा समोर आणले, दुष्काळात लहान लेकरांना रोज २ हजार भाकरी खाऊ घातल्या, सत्याचा शोध घेणारे फुले हे आजच्या जटील धार्मिक आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी फूले प्रेरक ठरतात.
यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून हरिश्चंद्र ननवरे, विचार मंचाचे अध्यक्ष रमेश गवळी, प्रा. अशोक वाघमारे, प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे हरीभाऊ कोळेकर, चंद्रमणी बोकेफोडे, विनोद गायकवाड, अॅड. राजू शेख, नागजी सोनवणे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड