Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महाविकास आघाडीला मतदान करा : डॉ.कैलास कदम

PCMC : महाविकास आघाडीला मतदान करा : डॉ.कैलास कदम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१८ – देशातील कामगार, कष्टकरी व शेतकरी, शेतमजूरांच्या न्याय हक्क व कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यातून स्पष्ट केले असल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व इंडिया, महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) उमेदवारांना मतदान करून निवडून आणण्याचे व लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी आवाहन केल्याची माहिती महाराष्ट्र इंटकचे प्रदेश अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी दिली आहे. pcmc news

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुक २०२४ (Loksabha 2024) करिता न्याय पत्र जाहीर केले आहे, त्यामध्ये श्रमिक न्याय, किसान न्याय, आर्थिक न्याय, हिस्सेदारी न्याय, युवा न्याय, नारी न्याय, संविधानिक न्याय, राज्य न्याय, रक्षा न्याय, पर्यावरण न्याय सविस्तरपणे न्यायाची गॅरंटी दिली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा अधिक मजबूत करणे, वेगवान आर्थिक बदल करून आपल्या देशाची समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.

काँग्रेस पक्ष कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार व शेतकरी (workers and farmers) यांचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्या जीवनमानाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व क्षेत्रातील सर्वसमावेशक योजना घेऊन आले आहेत.

न्याय्य वेतनासाठी सर्वसमावेशक घोषणापत्रासह, कामगार वर्गाच्या मागण्यांची रूपरेषा तसेच सामाजिक सुरक्षा, किमान वेतनाची हमी, संघटीत आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी व्यापक सामाजिक सुरक्षा उपाय प्रदान करणारी धोरणे लागू करण्याचे वचन देण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी यासह मजबूत ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये (infrastructure) गुंतवणूक करण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे, कृषी उत्पादनांची कार्यक्षम वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि कामगारांच्या सक्षमीकरणासाठी, कामगार कायदे मजबूत करणे आणि कामगार विरोधी ४ कामगार संहिता मागे घेण्याच्या दिशेने राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) काम करणार आहे.

तसेच इंटकचे उद्दिष्ट आहे की युनियन बनविण्याचा आणि संघटित करण्याचा अधिकार आणि सामूहिक सौदेबाजीचा/ वाटाघाटीचा अधिकार यासह कामगार कायद्यांची अंमलबजावणी करुन कामगारांच्या हित जोपासणे आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे अधिक स्वातंत्र्य, जलद वाढ, अधिक न्याय्य विकास आणि सर्वांसाठी न्याय आणि एक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी जिथे कामगार त्यांचे हक्क सांगू शकतील आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीसाठी व चांगल्या राहणीमानासाठी वाटाघाटी करू शकतील यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सत्तेवर आणणे आवश्यक आहे.

त्यामुळे कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य मतदारांना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) या केंद्रीय श्रमिक संघटनेच्या वतीने करण्यात आले असल्याचे डॉ.कैलास कदम यांनी सांगितले. pcmc news

संबंधित लेख

लोकप्रिय