Mumbai Gowandi : गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात रविवारी एक हृदय पिळवटणारी घटना घडली. 7 वर्षांची आकृती सिंह ही मुलगी भावडांसोबत खेळताना दुर्दैवाने दोरीच्या फासामुळे मृत पावली. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवार असल्यामुळे घरातील वडीलधारी मंडळी बाहेर गेली होती आणि घरातील मुलांचा दंगा सुरु होता. घरातील इतर भावंडे आणि शेजारील एका मुलीसोबत आकृती लपाछपी खेळत होती. खेळ सुरु असताना आकृती पोटमाळ्यावर लपली होती. त्याचवेळी ती पोटमाळ्यावरून उतरण्याचा प्रयत्न करत होती.
पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास अचानक तिच्या गळ्यात अडकला. उतरताना दोरीचा अंदाज आला नाही. आणि उतरण्याच्या गडबडीत फास आकृतीच्या गळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे ती फासात अडकली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी घरात कोणतेही वडीलधारी मंडळी नव्हती. आकृतीच्या मोठ्या बहिणीने ही बाब लक्षात येताच तत्काळ घराबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी तात्काळ घरात धाव घेत आकृतीला खाली आणले आणि तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
Mumbai Gowandi
या दुर्दैवी घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसांनी घेतली आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे आणि सर्वत्र शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन