Photo : Twitter |
ओटावा (कॅनडा) : कॅनडामध्ये कोरोना लस अनिवार्य करण्यात आल्याने त्याविरोधात आता देशभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. शनिवारी 50 हजार ट्रकचालकांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या निवासस्थानाला घेराव घातल्याने पंतप्रधानांना गुप्त ठिकाणी जावे लागले आहे.
‘एसएफआय’ च्या वतीने महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त ‘स्वच्छता मोहीम’
ट्रुडो सरकारने ट्रक चालकांना अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक केले आहे. या निर्णयाला वाहनचालकांनी विरोध केला आहे. शनिवारी राजधानीत निदर्शने करत आंदोलकांनी पीएम ट्रुडो यांच्यावर जोरदार टीका केली तसेच, कोविड निर्बंधांची फॅसिझमशी तुलना केली. राजधानी ओटावा येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घातल्याने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना आपल्या कुटुंबीयांसह गुप्त ठिकाणी गेल्याचे वृत्त समोर आलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गांधीजींच्या हत्ये संदर्भात वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी ट्रकचालकांना ‘कोणतेही महत्त्व नसलेले अल्पसंख्याक’ म्हटले होते. तसेच, ‘ट्रकचालक हे विज्ञानविरोधी आहेत आणि ते स्वतःसाठीच नाही तर इतर कॅनेडियन लोकांसाठीही धोका निर्माण करत आहेत.’ यामुळे ट्रकचालक प्रचंड संतापले. या संबंधीचे वृत्त डैली मेलने दिले आहे.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी “या” आयएएस अधिकाऱ्याला अटक