Photo : Twitter |
मुंबई : राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारचं होणार असून त्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे, अशी महत्वपुर्ण माहिती आज महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.
काही दिवसांपुर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, मात्र आज महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासोबतच आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारचं दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार असल्याचे यावेळी सांगितले.
शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षांची पूर्ण तयारी केली असुन कोरोनामुळे जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तासाचा वेळ वाढवून देण्यात येणार आहे.