नवी दिल्ली : भारतातील आघाडीची खाद्य व किराणा वितरण सेवा पुरवणारी कंपनी झोमॅटो (Zomato) लवकरच नवीन नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ‘इटर्नल’ (Eternal) हे नवे नाव मंजूर केले असून, शेअरधारकांची अंतिम मान्यता मिळवण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली आहे.
झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी शेअरधारकांना पाठवलेल्या पत्रात सांगितले की, “ब्लिंकिटचे (Blinkit) अधिग्रहण केल्यानंतर आम्ही ‘इटर्नल’ हे नाव आंतरर्गत वापरत होतो. आता ब्लिंकिट हा आमच्या भविष्यातील एक महत्त्वाचा घटक ठरल्याने, आम्ही कंपनीचे नाव सार्वजनिकपणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.”
नाव बदलल्यानंतर कंपनीची अधिकृत वेबसाइट zomato.com वरून eternal.com वर स्थलांतरित होणार आहे. तसेच, स्टॉक टिकर ZOMATO वरून ETERNAL असा बदलेल.
गोयल यांनी आपल्या पत्रात पुढे नमूद केले की, “इटर्नल हे नाव अत्यंत शक्तिशाली आहे आणि ते माझ्या मनात एक प्रकारची जबाबदारी आणि जबरदस्त शक्यता दर्शवते. कायमस्वरूपी यश हे केवळ मोठ्या दाव्यांवर किंवा गर्वावर अवलंबून नसते.”
झोमॅटोच्या या मोठ्या निर्णयामुळे कंपनीच्या भविष्यातील दिशेचा अंदाज बांधला जात आहे. शेअरधारकांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर, लवकरच कंपनी नव्या नावाने परिचित होईल.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, असा करा अर्ज