सुरगाणा (दौलत चौधरी) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुरगाणा येथे वनस्पतीशास्र व पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने दि.१४ जून म्हणजे “जागतिक रक्तदाता दिन” साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.ऐ.व्ही.पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी या वर्षाची “सुरक्षित रक्त, जीव वाचवते” ही संकल्पना विशद केली.
जनकल्याण रक्तपेढी, नाशिकचे संचालक प्रदिपजी मदनलाल गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी “रक्तदान म्हणजे जीवनदान “होय व रक्तदान का करावे? या विषयी जनजागृती निर्माण केली.
डॉ..डी.जी.कापडणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.पावडे यांनी केला. डॉ.स्मिता हरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले व प्रा.कविता भोये यांनी सुत्रसंचालन केले.