Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

खेड : ग्रामीण भागातील डेहणे आरोग्य केंद्रात सर्प दंश प्रतिबंधक लस उपलब्ध करा – राष्ट्रीय मानव अधिकार

---Advertisement---

---Advertisement---

खेड : ग्रामीण भागातील डेहणे आरोग्य केंद्रात सर्प दंश प्रतिबंधक लस उपलब्ध करा अशी मागणी राष्ट्रीय मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण यांनी आरोग्य अधिकारी डॉ. धैर्यशील पंडित यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकरी व शेतीवरील आधारित असणारे शेती पूरक व्यवसाय करत आहेत. अशा वेळेस खेड्यापाड्यात शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच ठाकर, कातकरी या समाज्याच्या लोकांना आपले कुटुंब चालवण्यासाठी भर पावसात, रानात व गवतात वणवण फिरून सरपण गोळा करणे, खेकडे पकडणे, रानभाज्या गोळा करणे, तसेच रानात गुरे चारनणे अश्या प्रकारची कामे नित्यनेमाने करावी लागतात. व ही नेहमीची कामे करत असताना त्यांना सर्प दंश सारख्या  घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यातच तत्काळ उपचार न मिळाल्याने नागरिकांना आपला जीव  गमवावा लागतो.          

याची खबरदारी म्हणून डेहणे येथील आरोग्य केंद्रात सर्प दंश वरील प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात यावी. यामुळे रूग्णाला तत्काळ उपचार मिळून त्यांचा जीव वाचेल.

निवेदन देतेवेळी राष्ट्रीय मानव अधिकार अध्यक्ष शरद जठार, उपाध्यक्ष सुनिल मिलखे, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक हे उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles