Friday, October 18, 2024
Homeजिल्हाशिरूर शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

शिरूर शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

पुणे, दि. २६ : राज्यातील  माता-भगिनीचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना  देण्याकरीता सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता शिरूर नगरपरिषदेतर्फे नुकतीच विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. (Majhi Ladki Bahin Yojana)

या विशेष मोहिमेअंतर्गत शिरूर शहरातील एकूण १० प्रभागामध्ये १२ मदत केंद्र स्थापन करण्यात आले. त्यामध्ये  शिरूर शहरातील १० अंगणवाडी शाळा, शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय, शिरूर नगरपरिषद नवीन कार्यालय या ठिकाणी फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आली.  त्याबरोबर शिरूर नगरपरिषदेतर्फे प्रत्येक प्रभागाकरिता १ वार्ड अधिकारी व १ डेटा एन्ट्री ऑपरेटर या नुसार ५ वार्ड अधिकारी व ५ ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. काही ठिकाणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असून घरोघरी जाऊनदेखील महिलांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. 

Majhi Ladki Bahin Yojana

आतापर्यंत शिरूर शहरातील १२ मदत केंद्रामध्ये ३ हजार ३८९ ऑनलाईन अर्ज तर ऑफलाईन ६०९ अर्ज असे एकूण ३ हजार ९९८ अर्ज भरण्यात आले आहेत. तरी पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर  नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

संबंधित लेख

लोकप्रिय