Sunday, February 16, 2025

‘विशाल कुठे आहेस? 26 तारखेला माझं लग्न आहे…’ 10 रुपयांची नोट सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे सगळेचजण या आठवड्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो.

आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या जोडीदारासाठी कोणी गुलाब (Rose) तर कोणी महागडं गिफ्ट (Expensive Gift) देतं. या दरम्यान सोशल मीडियावर दहा रुपयांची एक नोट व्हायरल होत आहे. एका प्रेयसीने आपल्या प्रियकरासाठी दहा रुपयांच्या नोटवर (10 Rupees Note) महत्वाचा मेसेज पाठवला आहे. ही नोट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

काय आहे मेसेज?
व्हायरल होणाऱ्या या मेसेजनुसार प्रेयसीचं लग्न ठरलं आहे. पण या लग्नापासून ती खूश नाहीए. यासाठी तीने आपल्या प्रियकराला मेसेज पाठवला आहे. लग्नाच्या मंडपातून पळवून घेऊन जा असं तीने आपल्या प्रियकराला सांगितलं आहे. विशेष म्हणजे हा मेसेज तीने दहा रुपयांच्या नोटवर लिहिला आहे. या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 10 रुपयांच्या नोटवर तीने विशाल या आपल्या प्रियकराला हा मेसेज लिहिला आहे. तर मेसेज लिहिणाऱ्या मुलीचं नाव कुसुम असं आहे.

विशाल-कुसुम होतायत व्हायरल
दहा रुपयांची ही नोट व्हायरल झाल्यानंतर विशाल आणि कुसुमची प्रेमकहाणी (Love Story) चर्चेत आली आहे. मेसेजमध्ये लिहिल्याप्रमाणे कुसुमचं 26 एप्रिलला ल्गना आहे. त्याआधी तीने आपला प्रियकार विशालसाठी हा मेसेज लिहिला आहे. मेसेजच्या खाली तीने I LOVE YOU तुझी कुसुम असं लिहिलं आहे. ही नोट त्रयस्थ व्यक्तीच्या हाती लागली आणि त्याने त्याचा फोटो काढूल सोशल मीडियावर शेअर केला.

हा फोटो एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोबरोबर त्याने एक कॅप्शन लिहिलं आहे, ट्विटर आपली ताकद दाखव, 26 एप्रिलआधी कुसुमचा हा मेसेज विशालपर्यंत पोहोचव. दोन प्रेम करणाऱ्यांचं मिलन होणं गरजेचं आहे. कृपया हा मेसेज शेअर करा, तसंच तुमच्या ओळखीतल्या विशाल नावाच्या प्रत्येक मुलाला हा मेसेज टॅग करा असंही त्या युजर्सने म्हटलं आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles