Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

गव्हाच्या पेरणीला वेग; वडवणी तालुक्यात अंदाजे 1 हजार 280 हेक्टर क्षेञावर गहू पिकांचे होणार पेरणी

---Advertisement---

वडवणी : आठवड्यापासून थंडी गायब झाल्याने उष्णता वाढली होती, दोन दिवसात पुन्हा थंडीची हुडहुडी भरली जात असल्याने ग्रामीण भागात व शहर परिसरात गव्हाच्या पेरणीला वेग आला आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात गव्हाचा पेराही वाढणार असल्याचे चित्र आहे. 

---Advertisement---

मागील आठवडाभरात हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज व ढगाळ वातावरण यामुळे गहू व हरभऱ्याची पेरणी खोळंबली होती. ढगाळ वातावरणाने थंडीही कमी झाली होती. गव्हाच्या पिकाला थंडी ही पोषक असते. मात्र तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व घटलेली थंडी यामुळे पेरणीचा वेग मंदावला होता. आता आभाळ पांगल्याने पुन्हा गहू व हरभऱ्याच्या पेरणीला वेग आला आहे. यावर्षी जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढत आहे. एकूणच पाणी पातळीत वाढ झाल्याने इतर बागायती पिकांबरोबरच गव्हाचेही क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या तूर व रब्बी ज्वारीचे पीक जोमात आले आहे. तुरीला शेंगा लागण्याबरोबरच ज्वारीचे पिकही पोषक वातावरण असल्याने जोमाने वाढत आहे

याबाबत तालुका कृषी अधिकारी गर्जे म्हणाले की, तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पेरण्या सुरू झाल्या आहेत. गहू पेरणी ही अंदाजे 1280 हेक्टर वर होईल.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles