Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकाय सांगता ! टाटा कंपनी आता आय फोन बनवणार ?

काय सांगता ! टाटा कंपनी आता आय फोन बनवणार ?

नवी दिल्ली : टाटा समुह कर्नाटकमधील विस्ट्राॅन काॅर्पची कंपनी अधिग्रहण करुन ऑगस्टच्या सुरुवातीला आयफोन निर्माता Apple चा कारखाना ताब्यात घेणार आहे. कर्नाटकातील विस्ट्रॉनच्या कारखान्याची किंमत अंदाजे र 4000 कोटी रु आहे. येथे 10 हजारपेक्षा अधिक कामगार काम करतात.

विस्ट्रॉनला भारतातील आयफोन उत्पादनातून बाहेर पडायचे आहे. त्यानंतर आता टाटाने ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. कंपनीने यंदाच्‍या आर्थिक वर्षात $1.8 अब्ज किमतीचे आयफोन निर्मितीचे अॅपलबरोबर करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा आणि विस्ट्रॉन यांच्यात चर्चा सुरू आहे. ते ऑगस्टमध्ये डील फायनल करू शकतात.

टाटाचा हा करार झाला तर टाटा भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनेल. यासोबतच मेड इन इंडिया iPhones लवकरच बाजारात दिसणार आहेत. मार्च 2024 पर्यंतच्या आर्थिक वर्षात हा करार आहे. यामध्‍ये पुढील वर्षापर्यंत कारखान्याचे कर्मचारी संख्या तिप्पट करण्याचाही प्रस्‍ताव आहे.

हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार

कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

संबंधित लेख

लोकप्रिय