आंध्रप्रदेश : उन्हाळ्यामध्ये थंडगार बियर म्हणजे तळीरामांसाठी साक्षात अमृतच. उन्हाळ्यात थंडावा आणि टेन्शन फ्री होण्यासाठी अनेक तळीराम हे बियरच्या आश्रयाला येतात. मात्र फुकटची बियर मिळाल्यावर तळीरामांची किती चंगळ होते हे नुकतेच पाहायला मिळाले. निमित्त होते ते बियर वाहतूक करणाऱ्या ट्रकचे पलटी होण्याचे.
आंध्रप्रदेशमधील अनकापल्ले जिल्ह्यातील राजमार्गावर बिअरचा ट्रक उलटला. जखमी चालक , क्लिनरला मदत करण्याऐवजी लोकांनी 200 हुन जास्त बिअरबॉक्सची लुटालूट सुरू केली. मद्यप्रेमी मंडळी बिनदिक्कतपणे बाटल्या घेऊन जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230607-WA0019.jpg)