श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या जगावर नजर ठेवणाऱ्या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आज श्रीहरिकोटा येथून करण्यात आले.
क्रायोजेनिक अप्पर स्टेज असलेल्या GSLV रॉकेट वापरण्यात आले. NVS-01 मार्फत टेहेळणी करून संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा प्रणालीमध्ये वाढ करेल, असा विश्वास इस्त्रोकडून या वेळी व्यक्त करण्यात आला. श्रीहरी कोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
---Advertisement---
चेन्नईपासून साधारण सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या या स्पेस पोर्टवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरून 51.7-मीटर-उंच, 3-स्टेज जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल सकाळी 10.42 वाजता नियोजीत वेळेनुसार हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.