Father Francis Dibrito : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज गुरुवार, २५ जुलै २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
आज पहाटे ५ वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्व आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक आणि लेखक असून धार्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेत मोठी मोहीम राबवली होती.
Father Francis Dibrito
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांचा अंत्यविधी मिस्सा आजच गुरुवारी, २५ जुलै २०२४ सायंकाळी ६ वाजता होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.


हेही वाचा :
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
दि. लातूर अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत भरती
शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार