माणगाव : पुणे, रायगड जिल्ह्यात अहोरात्र राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने पुणे रायगड वाहतूक ६-८ तास बंद राहणार आहे असे सांगितलं आहे. (Tamhini Ghat)
मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे. मुळशी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर कोसळलेली असून एक व्यक्ती मुळशी हद्दीत मृत झाली आहे. (Tamhini Ghat)
रायगड, पुणे प्रशासन आणि सरकारचे इतर विभाग ताम्हिणी घाटात वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत. (the administration is working on clearing the landslide debris on a war footing)
दरम्यान रायगडमध्ये पावसाचा जोर खूप वाढला आहे. ताम्हिणी घाटात तर गेल्या 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस झाला असून रायगड जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे, त्यामुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पाताळगंगा नदीच्या पातळीत मोठी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा :
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
दि. लातूर अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत भरती