Thursday, February 13, 2025

Uran massacre : यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला अटक

Uran massacre : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हिच्या हत्येप्रकरणातील आरोपी दाऊद शेख (२४) याला अखेर अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील क्राइम ब्रॅंचने आरोपीला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. यशश्रीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद शेख हा यशश्रीला २०१९ पासून ओळखत होता. यापूर्वी दाऊदला एकदा अटक करण्यात आली होती. यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेखविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. (Uran massacre) सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि कर्नाटकातील आपल्या गावी परतला. तिथे त्याने बस चालक म्हणून काम केले. प्रेम प्रकरणामुळे दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यशश्री दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्यामुळे दाऊद नाराज होता.

यशश्री शिंदेच्या (Yashshree Shinde) हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेला सुरुवात केली. अखेर मंगळवारी २९ जुलै रोजी क्राइम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी दाऊद शेखला शाहपूरा येथून अटक केली. कॉल रेकॉर्डनुसार, शेख २२ जुलै रोजी उरणाला आला होता आणि २५ जुलै पासून त्याचा फोन बंद झाला होता.

Uran massacre

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद शेखने यशश्रीचा पाठलाग केल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles