Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

URAN : मशाल निशाणी घरोघरी पोहोचवा, संजोग वाघेरे विजयी करा – मनोहर भोईर

उरण विधानसभा पदाधिकारी बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद, निष्ठावंत शिवसैनिकांना गद्दारी आवड नाही

उरण : उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कडवट आणि निष्ठावंत आहे. ठाकरे कुटुंबावार प्रचंड प्रेम करणारा आहे. त्याला गद्दारी अजिबात आवडत नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्यासाठी आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचे आहे. त्यासाठी घरा घरात आपली मशाल निशाणी पोहोचवा, असे आवाहन शिवसेना रायगड (raigad) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले.

मावळ लोकसभेचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. Uran news

---Advertisement---


या बैठकीला उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, राजिप सदस्य मोतीराम ठोंबरे, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी आदी मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Uran news

मनोहर भोईर पुढे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी (maval loksabha 2024) पक्षप्रुख उध्दव ठाकरे यांनी आपल्याला विनम्र, शब्दाला जागणारे अशी ओळख असलेले उमेदवार दिलेले आहेत. त्यांना उरण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द आपल्या सर्वाच्या वतीने मी पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यासाठी प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकापर्यंत मशाल पोहोचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

“येत्या 13 मेपर्यंत गाफील राहू नका”

गावोगावी महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सोबत घ्या. सर्वांनी आपण स्वतः उमेदवार आहोत, असा विचार करून प्रचारात कुठेही मागे न राहू नका. येत्या 13 मेपर्यंत कोणीही गाफील राहायचे नाही, असेही मनोहर भोईर यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles