जुन्नर / आनंद कांबळे : ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी, रत्नाकर महादेव आवटे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
ब्रेकिंग : पर्म विद्यापीठात दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू तर ६ जखमी
ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नर व परिसरात गेली २६ वर्षापासुन कार्यरत असुन संघाचे ६११ सभासद आहेत. संघाची सन-२०२१ ते २०२३ साठी निवडण्यात आलेली पदाधिकारी व कार्यकारिणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष सुधाकर वाडकर, कार्याध्यक्ष अनिल जोगळेकर, सचिव गोविंद हिंगे, सहसचिव श्रीकांत देशपांडे, कोषाध्यक्ष सिताराम जाधव, कार्यकारिणी सदस्य अजित परदेशी, पोपट भास्कर, माधव बारवे, सुभाष आवटे, सुभाष चौधरी, सुरेखा आढाव, संघाचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली.
हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !
ज्येष्टांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य शिबिरे, विविध व्याख्याने तसेच समाजोपयोगी उपक्रम यासाठी प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नाकर आवटे यांनी सांगितले. समाजातील विविध मान्यवरांकडून, पदाधिकारी व कार्यकारिणीचे स्वागत करण्यात येत आहे.
हेही पहा ! कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, असा करा अर्ज !