Wednesday, February 5, 2025

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री खा. डॉ. भारती पवार यांचे आशा व गटप्रवर्तकांनी जोरदार स्वागत करत केल्या विविध मागण्या !

नाशिक केंद्र आरोग्य राज्य मंत्री खा. डॉ. भारती पवार यांचे नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेने जोरदार स्वागत करत विविध मागण्या करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव कॉ. राजू देसले यांनी दिली. 

निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागात गेली 14 वर्षापासून गावातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य विभागाचे सेवा पुरविण्याचे काम आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर ( गट प्रवर्तक ) करत आहेत. कोरोना महामारीत स्वत: सह आपल्या रंगाच्या जिवाची पर्वा न करता जनतेचे प्राण वाचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी काम केले. या कोरोना योध्या आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांना आपल्या केंद्र सरकारने कायम कामगार म्हणून नियुक्त करून त्यांना आशा स्वयंसेविकाला 18 हजार रुपये व सुपरपायकार यांना 21 हजार रुपये  रूपये किमान वेतन मिळावे. 

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन्मानाची वागणूक मिळावी, आरोग्य खात्यातील रिक्त जागांवर आशा स्वयंसेविका व आता सुपरवायझर यांनी केलेल्या कामाच्या अनुभवावरून 10 % आरक्षण ठेऊन भरती करावे, आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांच्या कुटुंबालाही केंद्र सरकारने कोरोना विमा द्यावे, आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर प्रा.फंड प चॅज्युईटी कायदा लागू करा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा स्वयंसेविका य आशा सुपरवायझर, महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles