Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pandurang Sakpal : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pandurang Sakpal : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज शनिवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. 

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारे कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ यांची ओळख होती. ते पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड केली.

---Advertisement---

Pandurang Sakpal

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. “पांडुरंग सकपाळ..धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला.अनेक आंदोलनात पोलिसांचा मार खाल्ला, तुरुंग भोगला. पण, पांडुरंग मागे हटला नाही.पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता.असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला. विनम्र श्रद्धांजली!” अशी पोस्ट संजय राऊत यांनी केलीये.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles