नाशिक / सुशील कुवर : 75 व्या स्वातंत्र्य दिनी अडीच वर्षीय आराध्या अनिता जयराम गावित रा. तोरणडोंगरी ता. सुरगाणा जि. नाशिक या चिमुकलीने भारतातील संपूर्ण राज्याच्या राजधान्या केवळ 43 सेंकदात सांगून 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड रजिस्टर कंपनीने ने तिच्या या अनोख्या बौधिक कामगिरीची दखल घेऊन नोंद केली.
त्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे CEO राहुल बनसोडे यांनी आराध्या अनिता जयराम गावित हिचे प्रमाणपत्र, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देत कौतुक केले. तसेच तिला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी जयराम गावित, अनिता गावित, संजय वाघ, रामेश्वर साबळे, अक्षय गांधी, सुयोग वाघ, उमेश भोये, अमोल शिरसाठ आदी उपस्थित होते.