नवी दिल्ली – आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड सुरु आहे. रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi ट्रेंड होत आहे. मात्र यात एक ट्रेंड टॉपला आहे तो म्हणजे #NationalUnemploymentDay आणि #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस या प्रकारचे ट्रेंड ट्विटरवर सुरु झाले आहेत. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा ट्रेंड सुरु करुन राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला आहे. अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाई त्यांचा संताप व्यक्त करताना दिसत आहे.
वाढती बेरोजगारी पाहता मोदींने केले उपाय युवकांना अगदी तोडके वाटत आहे. २०१४ च्या निवडणूकीत प्रत्येक वर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वसन दिलेले होते. परंतु, गेल्या ६ वर्षात १० कोटी पेक्षा जास्त नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यास सरकारी आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग आहे. लॉकडाऊन पासून आतापर्यंत १.५ कोटी नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच, जीडीपी -२३ पेक्षा खाली आलेला आहे. स्वतंत्र झाल्यापासून एवढे नित्कृष्ट नियोजन कोणत्या पंतप्रधानांकडून झालेले नव्हते. त्याच बरोबर सार्वजनिक कंपन्यांची होत असलेली विक्री पाहता देश फक्त विकण्यासाठी आहे का ? असा प्रश्न ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत ते विचारत आहेत. आता पर्यंत बीएसएनएल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्तान पेट्रोलियम, एअर इंडिया सारख्या मोठमोठ्या कंपन्ययांंमध्ये मोठी नोकरकपात मोदी सरकारकडून करण्यात आलेली आहे.
मोदी सरकारने आतापर्यंत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांची आत्महत्या, शैक्षणिक आत्महत्या यांच्या संख्या लपवलेल्या आहेत. त्यासाठी सरकारच्या मर्जितल्या अधिकाऱ्यांच्या नेमणूका सरळ मोठ्या पदावर करण्यासाठी सरकारी नोकरीच्या परिक्षांना पर्याय नवीन नियमांमधून बनविण्यात आला. त्यामूळे सरकारी नोकरभरती कायमस्वरुपी ३५% कपात करण्यात आलेली आहे. रेल्वेमध्ये कोणतीही भरती करण्यात आलेली नाही, तसेच स्टाफ सेलेक्शन परिक्षांचा निकाल वर्षांनुवर्षे लागत नाही. हे सर्व प्रकार गेल्या ५ वर्षात घडत आलेले आहेत.
याच विरोधात तरुणांनी एकजूट केल्याचे समज आहे. सोशल मिडियावर तशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया या योजना अयशस्वी झालेल्या आहे.
त्यामुळे, मोदींना त्यांच्या २ कोटी नोकऱ्या देण्याच्या घोषणेची, सरकारी व्यवस्था सुधारण्यासाठी, अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी तरूण पंतप्रधान मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळणार आहेत.
या मोहिमेत AISA ही संघटना आघाडीवर असल्याचे समजते तसेच AISF, SFI, DYFI, AISF, AISA, DSU आणि इतर विद्यार्थी – युवक – कामगार संघटनांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिलेला नसला तरी यात भाग घेतल्याचे सोशल मिडियावर दिसत आहे.
कोरोनाची महामारी पसरत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी सोशल मिडियावर्तीच आंदोलन करणार असल्याचे तरूणांनी सांगितले. त्यामुळे या अभूतपूर्व आंदोलनाची मोदी सरकार कशाप्रकारे दखल घेते याकडेच जनतेचे लक्ष लागले असणारच!