ओतूर / महेश घोलप : ओतूर (ता.जुन्नर)येथील सामाजिक क्षेत्रातील पर्यावरणप्रेमी समीर शिवराम तांबे यांनी गृहवास्तुशांती निमीत्ताने रविवार (दि.२२) रोजी आलेल्या प्रत्येक पाहुण्यास पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकी १ झाड देऊन ७०० झाडे वाटुन पर्यावरण पूरक उपक्रम वास्तुशांती निमित्ताने केला.
पारंपारिक रूढी बदलून कुठे तरी नवीन विचार करणे निसर्गाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, तांबे कुटूबियांनी या वेळी सागितले, तसेच वस्तूनिमित आलेल्या प्रत्येक पाहुण्यास सागितले की झाडाची निगा राखवी व झाडाचे चांगले सगोपन करावे व तसेच आपण सर्वांनी जर लग्न समारंभ, शैक्षणिक कार्यक्रम, व्यवसाय कार्यक्रम, राजकीय सभामध्ये असे वृक्षवाटप केले तर येणाऱ्या पिढीसाठी ती मोलाची मदत होईल.
..अन्यथा हिरड्याच्या प्रश्नांवर 30 मे पासून बेमुदत आंदोलन, घोडेगाव प्रकल्प कार्यालयात बैठक
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
झाडे लावा, झाडे जगवा ह्या विचारासोबत झाडे वाटा,झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा विचार नव्याने जन्माला आला पाहिजे असे समीर तांबे यांनी बोलताना सागितले.
तांबे कुटुंबीयांनी केलेल्या उपक्रमाबद्दल जुन्नर तालुक्यातील पर्यावरण प्रेमींनी, नातेवाईक, मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.
जुन्नर : ग्रामपंचायत जळवंडी अंतर्गत उसराण येथे रोजगार हमीची कामे सुरू
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !