Sunday, July 14, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवाकड येथे दिव्यांग (ऑटिझम) विद्यार्थ्यांचे उन्हाळी शिबिर संपन्न

वाकड येथे दिव्यांग (ऑटिझम) विद्यार्थ्यांचे उन्हाळी शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड : अभिसार फाउंडेशन वाकड, पुणे येथे 4 मे ते 27 मे अशा २१ दिवसांचे दिव्यांग मुलांचे उन्हाळी शिबिर नुकतेच संपन्न झाले. आपल्या पालकांना सोडून पहिल्यांदाच विद्यार्थी निवासी शिबिरामध्ये राहिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढला पालकांचे चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहण्यास मिळाला.

या शिबीरामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. यामध्ये वेगवेगळे प्रकारच्या थेरपी, फनी गेम, म्युझिक, डान्स थेरपी, कलर थेरपी, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, स्टोन पेंटिंग, ब्लॉक पेंटिंग, स्टोरी टेलिंग, कुकिग या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

या शिबिराचे नियोजन प्राची पुरानिक, कल्पना मोहिते, आपटे मॅडम, डॉ. इंदिरा मोहिते, डॉ. रणदिवे, बालचंद्रन, तसेच अभिसार फाऊंडेशनचा स्टॉफ व कर्मचारीवर्ग यांनी केली होती.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

विधवांना महापालिकेचा आधार, 3 कोटी 29 लाख 90 हजाराचे अर्थसहाय्य

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय