पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मावळ खोऱ्यातील अतिदुर्गम भागात ठाकर,कातकरी,महादेव कोळी समाज अजूनही विपन्नावस्थेत आहे. विशेषतः खांडी, कुसवली, वडेश्वर परिसरात मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या आदिवासींना पावसाळ्यात अन्नधान्य, कपडे, साड्या, औषधे ई सर्व प्रकारची मदत आम्ही मिळवून देऊ, असे आश्वासन स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी मोई येथे सांगितले.
‘वुई टूगेदर फाउंडेशन’च्या एका प्रतिनिधी मंडळास अन्नधान्य, साड्या व साथीच्या आजारावरील औषधे कामगार संघटनेच्या वतीने येळवंडे कुटुंबाने दान दिली. गरजू व्यक्तींसाठी आवश्यक असणारी साधन सामग्री त्यांनी दुर्गम भागातील कष्टकरी लोकांना दिली. यापुढेही असेच सहकार्य करण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद, दिलीप चक्रे, रुकसाना काझी, संगीता गर्जे यांचेकडे यांनी 20 आदिवासी कुटुंबासाठी अन्नधान्य, साड्या, औषधे सारिका येळवंडे यांनी सुपूर्द केल्या. त्यावेळी त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
Heavy rain : हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार
कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

