पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांना “भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार” असे संबोधले होते. यावर शरद पवार यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले होते.” पवार यांनी हे वक्तव्य शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाच्या प्रकाशन सोहळ्यात केले. उर्दू साहित्यिक नुरूल हसन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पवार यांनी आठ दिवसांपूर्वी झालेल्या अमित शाह (Amit Shah) यांच्या टीकेला उत्तर देतांना सांगितले की, “देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांचे सरदार म्हणून मला संबोधले गेले आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की गुजरात दंगलीच्या काळात कायद्याचा गैरवापर केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे.”
शरद पवार यांनी पुढे नरेंद्र मोदींना टोला मारत सांगितले की, “माझा माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही.”
याशिवाय, पवार यांनी भाजपच्या नेत्यांच्या विधानांवर टीका केली की, “देशाची राज्यघटना बदलण्यासाठी लोकसभेत ४०० जागा पाहिजे असे विधान कर्नाटकच्या भाजपच्या नेत्याने केले होते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी भारतीय राज्यघटना दिली आहे, तिला वाचविण्यासाठी जनतेने भाजपला धडा शिकवला.”
हेही वाचा :
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी