मानखुर्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मानखुर्द शाखेच्या वतीने आज दिनांक 26/05/23 रोजी महाराष्ट्र नगर मानखुर्द येथील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज जन आक्रोश आंदोलन मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. परंतु त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बीएमसी सहाय्यक आयुक्त ससाणे यांच्याशी माकपच्या शिष्टमंडळाची आज सकाळी भेट घडवून आणली. तब्बल दीड तास खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
1) नाला रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर सुरू असुन 300 मीटर बी एम सी व 400 मीटर एम एम आरडी ने काम केले आहे. अजुन 700 मिटर नाला रुंदीकरण करायचे असून जसजसे लोकांचे पुनर्वसन करून जागा उपलब्ध होईल तसतसे नाला रुंदीकरण होईल.
2) परिशिष्ट 2 ची यादी तयार होत असून नालाबाधित लोकांचे महाराष्ट्र नगर मध्येच शिफ्टिंग होणार असून त्याकरिता घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घुसखोर कोर्टात गेल्याने वेळ लागत आहे.
3) खंडोबा मंदिर येथील सार्वजनिक शौचालय नादुरूस्तआहे ते पाडण्यात येत आहे. येत्या 15 जून पर्यंत येथील नागरिकांना 40 सीटचे तात्पुरते शौचालय उपलब्ध करून देण्यात येईल व शौचालयाला लागून असणाऱ्या सात दुकानांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी दुमजली सुसज्ज नवीन शौचालय बाधंण्यात येईल.
4) सबवे मध्ये पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेतलेली असुन या सबवेच्या बाजूला मोठे खड्डे तयार होऊन पाणी तुंबु नये व रहदारीवर परिणाम होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे, MMRDA व बी एम सी च्या समन्वयाने प्रयत्न सुरू आहे. Sppl च्या काही इमारतींच्या आवारातही पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
5) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजुन बी एम सी ने फेरीवाले धोरण तयार केलेले नाही. याबाबत मनपा मुख्य कार्यालय धोरण ठरवत असून पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करणार नाही. रहिवाश्यांना अडचण येऊ नये म्हणून त्यांना एका बाजूला मार्केट उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत.
या विषयांवर सहाय्यक आयुक्त ससाणे यांनी चर्चा केली. त्यांनी खास करून या शिष्टमंडळात महिला असल्याने त्यांचे कौतुक केले व सविस्तर उत्तरे दिली. त्यानुसार पुढे कामे झाली नाहीत तर आपण आम्हाला कधीही भेटून तक्रार करू शकता त्याची त्वरीत नोंद घेऊ असे त्यांनी सांगितले. पालिकेने या संदर्भात केलेली कारवाई याबाबतच्या पत्रव्यवहारचे लेखी उतर दिले.
शिष्टमंडळात काॅ. आरमायटी इराणी, संगीता काबंळे, दत्तात्रय ननावरे, सुहासिनी कानसे, लीला भिसे, रेखा सलते, देवी जाधव तसेच फेरीवाले प्रतिनिधी व वस्तीचे त्रस्त रहिवाशी उपस्थित होते.