Friday, November 22, 2024
Homeजिल्हाशंकराच्या रूद्रावतारातील मूर्ती बघण्यासाठी होतेय तोबा गर्दी

शंकराच्या रूद्रावतारातील मूर्ती बघण्यासाठी होतेय तोबा गर्दी

कोल्हापूर / यश रुकडीकर : कोल्हापूरमध्ये सर्वत्रच गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. प्रत्येक मंडळाने बसवलेल्या गणपतीच्या मूर्ती सुरेख,अप्रतिम आहेत. दरवर्षी नवनव्या संकल्पना पुढे आणणाऱ्या आकर्षक गणेशमूर्तींची कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठापना होत असते. त्याचप्रमाणे जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाने प्रतिष्ठापना केलेली गणेशमूर्ती सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. 

शंकराच्या रुद्रावतारातील 21 फुटी गणेशमूर्ती जनमानसाच लक्ष वेधून घेत आहे.ही मूर्ती ऋषिकेश निगवेकर यांनी बनवली असून शहीद भगतसिंह तरुण मंडळ हे मागील 48 वर्षे गणपतीची प्रतिष्ठापना करत आहे.1975 पासून अविरतपणे या मंडळाकडून श्रींची सेवा सुरू आहे.

उत्सव समिती कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रमोद नायकवडे यांच्यासह रविराज भोसले, अमित चव्हाण, अभिषेक कल्याणकर, श्रीशैल स्वामी, रोहन गाडेकर चिन्मय स्वामी, मंथन वेल्हाळ, ऋतुराज पाटील यांनी या देखाव्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय