Sunday, March 16, 2025

जुन्नर तालुक्यात हिरडा चोरीची घटना; वृद्ध आदिवासी दाम्पत्याचे वर्षभराचे मोठे नुकसान

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

(प्रतिनिधी) :- जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सुकाळवेढे (ढेंगळेवाडी) येथील जानकू मारुती ढेंगळे यांच्या राहत्या घरातुन चोरट्यांनी हिरडा चोरी करून नेल्याची घटना घडली असून अज्ञात चोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे गेली तीन-चार महिने आदिवासींच्या हाताला रोजगार नाही त्यातच ढेंगळे दांपत्याचे हिरडा चोरी गेल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन ढासळले आहे.

          जुन्नर तालुक्‍यातील आदिवासी भागातील सुकाळवेढे गावातील ढेंगळेवाडी येथील जानकू ढेंगळे यांच्या राहत्या घरातील सुमारे दीडशे किलो हिरडा चोरीस गेला असून ही घटना सोमवारी (१३ जून) रात्री घडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

      ढेंगळेवाडी येथील हे दांपत्य रोजंदारीवर जाऊन आपली उपजीविका करते, हिरड्याच्या हंगामात हिरडा गोळा करून त्याची साठवणूक करून तो बाजारात विकला जातो पण लॉकडाऊन काळात सर्वच बंद असल्याने हा हिरडा घरीच पडला होता, त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी हिरडा चोरून नेला असल्याने या दांपत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, सुमारे दीडशे किलो असणारा हा हिरडा म्हणजे सुमारे ३० हजार रुपयांच्या किंमतीच्या आसपास असणारी रक्कम म्हणजे गरिब दांपत्यासाठी कमी नाही.

             प्रचंड मेहनत करून गोळा केलेला हा हिरडा चोरी गेल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे हे दांपत्य वृद्ध असून जमेल ती व जमेल तशी रोजंदारी करत असतात, हिरड्याच्या मिळालेल्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचे वर्षभराचे गणित सुखकर होते. त्यामुळे बुडालेला रोजगार कमी नाही त्यातच हिरडा चोरीच्या घटनेने या दाम्पत्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

         या संदर्भात आंबे गांवचे सरपंच मुकुंद घोडे आणि DYFI चे जुन्नर तालुका सचिव कॉम्रेड गणपत घोडे यांनी ढेंगळे कुटुंबाला भेट देऊन न्याय मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles