Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : महापुरुषांबरोबरच रतन टाटा यांना अभिवादन करुन श्रुती व मयूर यांचा अभिनव मंगल परिणय संपन्न

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहराचे नाव औद्योगिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने घेतले जाते. त्याची पायाभरणी टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून झाली आहे. टाटा उद्योग समूह आणि या शहरातील औद्योगिक विकास वाढीला ज्येष्ठ उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा आणि टाटा मोटर्स कंपनीचे अमूल्य योगदान आहे. (PCMC)

वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार मिळत असून शहराच्या व देशाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे गती मिळाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक रोजगार निमित्त या शहरात येऊन स्थिरस्थावर झाले आहेत. यामध्ये हजारो कुटुंब टाटा मोटर्सशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडले गेलेले आहेत. स्वर्गीय रतन टाटा यांनी आपल्या कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांना आपल्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे सांभाळून त्यांच्यावर प्रेम केले.

यापैकीच एक टाटा मोटर्सचे कर्मचारी गोकुळ चव्हाण यांचे कुटुंब आहे. रतन टाटा यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत कर्मचारी गोकुळ चव्हाण यांनी आपल्या मुलाच्या मंगल परिणय सोहळ्यात पुरोगामी विचारांचा वारसा जपत अभिनव पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेबरोबरच स्वर्गीय रतन टाटा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (PCMC)

गोकुळ चव्हाण यांचा चिरंजीव मयुर व चिंचवड येथील रहिवाशी आयु. सुधाकर गंगाधर तुंगेनवार यांची कन्या श्रुती यांचा अभिनव मंगल परिणय सोहळा नुकताच संपन्न झाला. चव्हाण व तुंगेनवार कुटुंबातील सदस्य आणि संजय बनसोडे, सुधीर कडलख, पोपट भालेराव, शहाजी कांबळे आणि दोन्ही नातेवाईकांच्या समन्वयातून या विवाह सोहळ्यात सर्वांपुढे पुरोगामी विचारांचा आदर्श ठेवण्यात आला. यावेळी चव्हाण व तुंगेनवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वर्गीय रतन टाटा यांच्या विषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली.

या विवाह सोहळ्यास तसेच वधु, वरांस आशिर्वाद देण्यासाठी शेती, उद्योग, कामगार, राजकीय, सामाजिक, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, प्रशासनातील विविध मान्यवर व नातेवाईक आप्तेष्ट बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी टाटा मोटर्स मधील कर्मचारी व अधिकार्‍यांना स्वर्गीय रतन टाटा यांचा फोटो पाहून गहिवरून आले. महापुरुषांसोबत रतन टाटा यांनाही अभिवादन करणारा, कृतज्ञता व्यक्त करणारा अशाप्रकारचा भारतातील हा पहिलाच मंगल परिणय सोहळा झाला त्याची शहरभर चर्चा होत आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles