मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई (Mumbai) येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. (Mumbai)
पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
हेही वाचा :
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये
सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!
ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी
ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ
मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI