Tuesday, June 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

चक्क माकड बसलं कुत्र्याच्या पाठीवर, दोघांचा एकमेकांशी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. कारण दररोज व्हायरल होणाऱ्या हजारो व्हिडीओमध्ये काही काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं.

खरं तर जगात असे अनेक प्राणी आहेत ज्यांचे एकमेकांशी कधीही पटत नाही. म्हणजे ते कधी समोरासमोर आले तरी एकमेकाचा जीव घ्यायला तयार असतात. मग ते साप आणि मुंगूस असो किंवा माकड आणि कुत्रा हे प्राणी नेहमीच समोरच्याला आपला शत्रू समजतात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालादेखील आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण निसर्गाचा नियमच या व्हिडीओतील माकड आणि कुत्र्यांनी मोडीत काढला आहे. तो कसा ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजणार आहे.

---Advertisement---



विदित शर्मा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन दोन कुत्र्यांचा आणि माकडाचा अनोखा असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक माकड बिनधास्तपण दोन कुत्र्यांशी खेळताना दिसत आहे. व्हिडीओत दोन कुत्रे दिसत आहेत. एक काळ्या रंगाचे आणि दुसरे तांबड्या रंगाचे. यावेळी एक माकडाचं पिल्लू काळ्या कुत्र्याच्या पाठीवर चिकटून बसल्याचं दिसत आहे. तर काही वेळाने ते उडी मारुन दुसऱ्या कुत्र्यांच्या पाठीवर जाऊन बसल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे कधीही एकमेकांशी न पटणाऱ्या या दोन प्राण्यांमधील अनोखं नातं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडल्याचंही पाहायला मिळत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles