Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे जगाला निरोगी आरोग्याचा संदेश !

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची भावना

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: देशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा करून संपूर्ण जगाला निरोगी आरोग्याचा संदेश दिला आहे. जगभरात योग दिवस साजरा होत असून, पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. नव्या पिढीला योगाचे महत्व पटवून दिले पाहिजे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी – चिंचवड भाजपातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विधानसभा मतदार संघनिहाय योग आणि मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. पतंजली योगपीठच्या सहकार्याने भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत इंद्रायणीनगर येथील सी-सर्कल येथे योगा शिबीर झाले. यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, भाजपा कामगार आघाडीचे हनुमंत लांडगे, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे आदी उपस्थित होते.

---Advertisement---



मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन शिबिराला सुरूवात करण्यात आली. तसेच, उद्योजक प्रताप मोहीते, सुरेंद्र वाधवा, सदाशीव बोराटे, मोहनराज कुलकर्णी, उद्योजिका सुनीता पाटसकर, माणिक पडवळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजिका गीता महेंद्रू यांच्या वतीने शिबिराचे संयोजन करण्यात आले. प्रशिक्षक सुनिल हुले यांनी प्रशिक्षण दिले व सूत्रसंचालन संतोष वरे यांनी केले.


मदनलाल धिंग्रा मैदानावर योग शिबीर

भाजपातर्फे मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत एकत्रित योगा कार्यक्रमाचे आयोजन मदनलाल धिंग्रा मैदान, प्राधिकरण या ठिकाणी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शहराध्यक्ष तथा आमदार आमदार महेश लांडगे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, विधान परिषद आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड शहर प्रभारी वर्षा डहाळे, प्रदेश निमंत्रित सदस्य शंकर जगताप, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, शहर उपाध्यक्ष राजू बाबर, माजी नगरसेवक शितल शिंदे, संदीप कस्पटे, चंद्रकांत नखाते, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, जिल्हा उपाध्यक्ष समीर जावळकर, गणेश ढाकणे, नितीन अमृतकर, कैलास सानप, राजेंद्र ढवळे, अनिल राऊत, सुर्यकांत मोहिते, प्रदीप बेंद्रे, तेजस्विनी कदम, अरुण थोरात, सरिता साने आदी उपस्थित होते. पतंजलीचे योग गुरू अतुल आर्य आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमासाठी 300 नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन लोकसभा संयोजक राजू दुर्गे यांनी केले होते.

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका


ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles