Wednesday, February 5, 2025

पिंपरी शहराला मुसळधार पावसाने झोडपले

पिंपरी : पिंपरी शहरात मंगळवार १६ नोव्हेंबर रात्री ११ वा अचानक आलेल्या तुफानी पावसामुळे हवामान थंड झाले. आठवडाभर वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी या सुखद पावसाचा आनंद घेतला.

निगडी, आकुर्डी, चिखली, तळवडे, पिंपरी, कासारवाडी या उपनगरात तासभर पाऊस पडत होता. विजांचा लखलखाट आणि मध्यम स्वरूपाच्या गडगडाटामुळे झोपी गेलेले नागरिक जागे झाले. अनेक गृहसंकुलांच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी साचले होते. सदनिकांच्या गॅलरीमध्ये पावसाच्या पाण्याचा शिरकाव झाला होता. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles