जुन्नर : पश्चिम पट्ट्याच्या आदिवासी भागातील न्यू इंग्लिश स्कूल, निमगिरी विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षा मार्च २०२३ चा निकाल ९५.४५% लागला, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.लांडे यांनी दिली. विद्यालयाची शैक्षणिक कामगिरी सतत चांगली राहिली आहे.
विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :
१) प्रथम क्रमांक – गागरे समीर तुळशीराम – ८२.४०%
२) द्वितीय क्रमांक – सोनाली तानाजी मोरे – ७४.२०%
३) तृतीय क्रमांक – लांडे तुषार राजाराम – ७३.८०%
४) चतुर्थ क्रमांक – साबळे गणेश जानकू – ७१.२०%
५) पाचवा क्रमांक – योगिता रामदास दिघे ६८.६०%
विद्यालयातील नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक ए.आर.पवार, ज्येष्ठ शिक्षक डी.बी. मानकर, डी.एस. केंद्रे, जे.एस.गायकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालय आदिवासी दुर्गम भागातील असून सुद्धा एस. एस. सी. परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन सह्याद्री विद्या विकास मंडळ नारोडी संस्थेचे सचिव चंद्रशेखर हुले, केंद्र प्रमुख संजय जाधव, निमगिरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन साबळे, ग्रामस्थ आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱी यांनी अभिनंदन केले.
मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)